X
आता खरेदी करा
Know About Diseases April 8, 2019

जपानी एन्सेफलायटीस

जपानी एन्सेफलायटीसः वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न

 

1. जपानी एन्सेफलायटिस म्हणजे काय?

जपानी एन्सेफलायटीस हा मच्छरांमुळे होणारा जपानी एन्सेफलायटिस विषाणूमुळे झालेला रोग आहे आणि प्रामुख्याने कुलेक्स मच्छराने पसरवला जातो. मानवांना ह्या व्हायरसचे अपघाती यजमान मानले जाते, म्हणजेच, हा विषाणू प्रामुख्याने प्राणी, म्हणजे डुक्कर आणि पाण्याजवळ असणारे पक्षी (बगळा) यांना  संसर्ग करतो. हा विषाणू मनुष्यामध्ये दीर्घ काळ जगत नाही आणि  सामान्यतः तो अगदी लहान प्रमाणात उपस्थित असतो म्हणून खाणारा मच्छर संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून विषाणू घेऊ शकत नाही आणि दुसर्या व्यक्तीला पसरवू शकत नाही. हा रोग आशिया आणि पश्चिम पॅसिफिकमधील ग्रामीण भागात मर्यादित आहे.

 

2. जपानी एन्सेफलायटीसचे लक्षणे काय आहेत?

 

जपानी एन्सेफलायटिसच्या बहुतेक प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. इतर प्रकरणात  (1% पेक्षा कमी), संसर्गामुळे न्यूरोलॉजिकल समस्यांमुळे डोकेदुखी किंवा मेनिंजायटीस (मेंदूच्या पेशींचा दाह) होऊ शकतो. इतर लक्षणामध्ये ताप, झटका, मानेची ताठरता, दिशाभूल, कंप, पक्षाघात आणि समन्वय नसणे यांचा समावेश असतो. गंभीर प्रकरणांमध्ये किंवा उपचार न केल्यास जपानी एन्सेफलायटिसमुळे मज्जासंस्थाचे कायमस्वरुपी नुकसान आणि / किंवा मृत्यू होऊ शकते.

 

3. जपानी एन्सेफलायटीसचा उपचार काय आहे? त्यासाठी काही लसी उपलब्ध आहेत का?

 

जपानी एन्सेफलायटीससाठी कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही; लक्षणांच योग्य व्यवस्थापन महत्वाचे आहे. यात वेदना नाशक, ताप कमी करण्यासाठी औषधे आणि भरपूर द्रवपदार्थांचा समावेश आहे. सामान्यतः, न्यूरोलॉजिकल लक्षणे दर्शविणारे रुग्ण निरीक्षणार्थ आणि सहाय्यक काळजी घेण्यासाठी रुग्णालयात दाखल केले जावेत.

 

जपानी एन्सेफलायटीस विरूद्ध व्यावसायिक लस उपलब्ध आहे. 2 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हे वापरण्यास मान्यता आहे. ज्या लोकांना स्थानिक भागात 30 दिवसांपेक्षा जास्त काळ घालवायचा आहे किंवा जपानी एन्सेफलायटीस सामान्य आहे अशा ग्रामीण भागात आणि उघड्यावर दीर्घ काळ घालवतात अशा लोकांना याची शिफारस केली जाते. या लसीचे 2 डोस असतात, जे 28 दिवसांच्या फरकाने द्यावे लागतात. या भागात प्रवास करण्यापूर्वी दुसरा डोस एक आठवड्यापेक्षा उशिरा दिला जाऊ नये. जपानी एन्सेफलायटीसच्या लसीकरणाबद्दल काही प्रश्न असतील तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भवती स्त्रियांसाठी सामान्यतः लसी मिळत नाहीत, परंतु खात्री करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

4. जपानी एन्सेफलायटीस झाला आहे का ते कसे शोधू शकता  / जपानी एन्सेफलायटीसचे निदान करण्यासाठी कोणते परीक्षण उपलब्ध आहेत?

 

न्यूरोलॉजिकल लक्षणे दर्शविणारे रुग्ण आणि आशिया आणि स्थानिक पॅसिफिक प्रदेशात राहणार्‍या रुग्णांमध्ये विषाणूचा शोध घेण्यासाठी सेरेब्रोस्पिनील फ्लूइड (CSF) तपासून जपानी एन्सेफलायटीसचे निदान केले जाऊ शकते.

 

5. जपानी एन्सेफलायटिस कसा टाळता येईल?

 

जपानी एन्सेफलायटिस प्रामुख्याने कुलेक्स मच्छराने पसरवला जातो. घराच्या आत आणि बाहेर या मच्छरांपासून संरक्षित करणे महत्वाचे आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी, गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन (किंवा गुडनाइट कूल जेल / गुडनाइट पॅच इ.) सारख्या वैयक्तिक रीपेलंट्सचा वापर मच्छर दंश रोखू शकतो. घरी असताना संध्याकाळी दरवाजे आणि खिडक्या बंद करा आणि गुडनाइट एक्टिव्ह+ आणि गुडनाइट फास्ट कार्ड सारख्या घरगुती पातळीवरील रिपेलंट्सचा वापर रात्रभर डासांना दूर ठेवेल. अधिक संरक्षणासाठी मच्छरदानीत झोपले पाहिजे.

 

6. जपानी एन्सेफलाइटिसमुळे पसरवणारे मच्छर (कुलेक्स आणि मानसोनिया) कसे वागतात?

 

जपानी एन्सेफलायटीस ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात आढळलेल्या कुलेक्स मच्छराने पसरतो.   कुलेक्स मच्छर रात्रीच्या वेळी दंश करणे पसंत करतात. ते प्रदूषित पाणी, डबके, भातशेती किंवा वृक्ष-वनस्पती असलेल्या  पाण्यामध्ये प्रजनन पसंत करतात. ही प्रजाती सामान्यत: गुरेढोरे, डुकर आणि पक्ष्यांना चावतात आणि जर माणस त्याच वातावरणात किंवा या प्राण्यांच्या जवळील भागात असतील तर अनपेक्षितपणे माणसांना चाउ शकतात – उदा. शेतकरी किंवा ग्रामीण भागात राहणारे लोक जेथे शेतीविषयक क्रिया सामान्य आहेत.

 

7. जपानी एन्सेफलायटीस बद्दल अधिक माहिती कोठे मिळू शकेल?

 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO), सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) आणि द नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम ऑफ इंडिया (NVBDCP)च्या  वेबसाइट जपानी एन्सेफलायटीस, त्याचे लक्षणे आणि उपचार याविषयी अद्ययावत माहिती प्रदान करतात.

 

न्यूरोलॉजिकल समस्यां, डोकेदुखी, झटका, दिशाभूल,मानेची ताठरता या समस्यांसह ताप अनुभवत असाल तर कृपया स्थानिक डॉक्टर, हेल्थ क्लिनिक किंवा हेल्थकेअर प्रदात्यांचा सल्ला घ्या.

 

स्रोतः

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO),

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC)

नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम ऑफ इंडिया (NVBDCP)

 

Related Articles

डेंग्यूपासून आपल्या मुलांचे संरक्षण करा – 5 आवश्यक गोष्टी

Read More

मुलांमधिल डेंग्यू ताप – बचाव, लक्षणे आणि उपचार

Read More
सिट्रोनेला तेल, नीलगिरी तेल - 100% नैसर्गिक डांस विकर्षक

नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट ना समजून घेणे – सिट्रोनेला आणि नीलगिरी तेल

Read More

मॉस्किटो रिपेलंटस च्या दंतकथांची पोलखोल!

Read More

भारतात मॉनसून पावसा बरोबर मलेरिया आणि डेंग्यू वाढत आहेत

Read More

मलेरियाची चिन्हे जाणून घ्या आणि रात्रीच्या वेळी हत्याकांडापासून स्वतःला वाचवा!

Read More

Find The Right Repellent

Find Your Protector