X
आता खरेदी करा
Know About Diseases July 25, 2019

डेंग्यूपासून आपल्या मुलांचे संरक्षण करा – 5 आवश्यक गोष्टी

WHO (डब्ल्यूएचओ)च्या म्हणण्यानुसार जगभरात डेंग्यूच्या संसर्गाची 390 दशलक्ष प्रकरण इतकी वाढ झाली आहे. डेंग्यू एडीस मच्छरांच्या चाव्यामुळे होतो. म्हणून, स्वत: ला आणि आपल्या कुटुंबास डेंग्यूविरोधी संरक्षण देण्याचे पहिले पाऊल म्हणजे मच्छरांना दूर ठेवणे.

 

आपल्या कुटुंबास डेंग्यू-पसरव्ंनार्‍या  मच्छरांपासून संरक्षित करण्यात मदत करण्यासाठी येथे 5 आवश्यक गोष्टी आहेत.

 

साठलेलं पाणी काढून टाका

 

डेंग्यू आणि चिकनगुनियाचे मच्छर आपल्या घरात आणि आसपास सहजपणे उपलब्ध असलेल्या स्वच्छ साठलेल्या पाण्यामध्ये पैदास करतात; म्हणूनच, पहिली पायरी ही आहे की आपण शक्य तितक्या जास्त खुल्या पाणी संचयित करणार्‍या स्रोतांचा नाश करू. कोणत्याही वेळी, आपले मुल आपल्या बिल्डिंग कॉम्प्लेक्सच्या किंवा परिसरातल्या पार्क्सच्या खुल्या भागामध्ये खेळतात, तेथे किडीज पूल, फव्वारे आणि पक्षांसाठी बाथ असणारी कोणतीही जागा असल्यास लक्ष द्या. जर असे असेल तर, प्रत्येक तीन दिवसांनी पक्षी बाथ स्वच्छ केले जातील हे सुनिश्चित करा. जर तुमच्या आवारात एक फुगवणारा किडीज पूल असेल तर प्रत्येक जलतरणानंतर त्यातून पाणी काढून टाकावे आणि त्याला उलटे करून ठेवावे जेणेकरुन त्यात पाणी साठणार नाही.

 

 

 

वॉटर स्टोरेज भांडी आणि कंटेनरवर लक्ष ठेवा आणि कोणत्याही फ्लॉवर पॉट प्लेट्स, व्हेसेस, एसी ट्रे आणि फ्रिज ट्रे संरक्षित आहेत याची खात्री करा आणि प्रत्येक 3 दिवसातून एकदा त्यांच्यातल  पाणी काढून टाकावे याची खात्री करा. डेंग्यू डासांच्या पैदासच्या अधिक स्थळांची तपासणी करा येथील साइटवर.

 

नियमित फॉगिंगची खात्री करा

 

बहुतेक सर्व निवासी कॉम्प्लेक्स आणि आसपासच्या परिसरात नियमितपणे फॉगिंग करतात. जर आपल्या सोसायटीत हे घडत नसेल तर कृपया आपल्या सोसायटीच्या समितीने पुढील अजेंडामध्ये नियमितपणे फॉगिंग करण्याची व्यवस्था स्वीकारली असल्याचे सुनिश्चित करा. आपण आपल्या स्थानिक नगरपालिकेत देखील आपल्या सोसायटीत डेंग्यू लार्वाच्या प्रजननाची नियमित तपासणीसाठी संपर्क साधू शकता, तसेच ते नियमित फॉगिंगसाठी प्रॅक्टिस देखील लागू करण्यास मदत करतात.

 

 

संरक्षण करण्यासाठी ड्रेस

 

पूर्ण-आस्तीन कपडे घालण्यासाठी निवडा, त्यामुळे कमी पृष्ठभागाचा मच्छरांशी संपर्क साधला जातो. मच्छर घट्ट सिंथेटिक कपड्यांमधून चावा घेऊ शकतात म्हणून आपल्या मुलांना आरामदायी व शरीराला घट्ट न बसणारे कपडे घालणे सुनिश्चित करा.

 

बाहेर वैयक्तिक मॉस्किटो रिपेलंट वापरा

 

जेव्हा आपली मुल्ं घराबाहेर जातात तेंव्हा ते बाहेर वापरायचे मॉस्किटो रिपेलंटस किंवा वैयक्तिक रीपेलेंट्स लागू करतात हे सुनिश्चित करा. हे रेप्लेन्ट्स क्रीम, तेल, पॅच, जेल आणि नव्याने सादर केलेल्या फॅब्रिक रोल-ऑन सारख्या बर्‍याच स्वरूपांमध्ये उपलब्ध आहेत.

 

गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन वापरा जे शुद्ध सिट्रोनेला आणि नीलगिरीच्या तेला पासून बनते. आपल्या कपड्यांवर फक्त 4 ठिपके लाऊन, ते 100% नैसर्गिक संरक्षण देते. आपण गुडनाइट पॅच देखील वापरु शकता जो आपल्या बाळाच्या कपड्यांना लागू करता येतो आणि 8 तासांच्या संरक्षण देतो.

 

 

आपल्या बागेत मच्छर प्रतिकारक वनस्पती समाविष्ट करा

 

लेमन ग्रास सारख्या काही वनस्पती त्यांच्या मच्छर-प्रतिकारक गुणधर्मांकरिता ओळखल्या जातात, ही झाडे आपल्या बागांच्या सुंदर सजावटीच्या वनस्पती म्हणून देखील कार्य करतात आणि त्यांना फार कमी देखभालिची आवश्यकता असते. आपण आपल्या बागेत हयांच रोपण करू शकता, जरी ते मच्छरांच्या संसर्ग काळात मोठ्या प्रमाणावर मदत करणार नाहीत तरी ते नक्कीच काही प्रमाणात मच्छरांना दूर ठेवतील.

 

 

मच्छर-प्रतिकारक गुणधर्म असलेल्या इतर वनस्पतींमध्ये सिट्रोनेला, तुळस, कॅटनीप आहेत. जेंव्हा डेंग्यूची साथ येते तेंव्हा लहान पार्याय खूप मोठ कामं करू शकतात. आपल्या मुलाची सुरक्षा सुनिश्चित करा आणि डेंग्यूची काही चिन्हे कशी आहेत याबद्दल वाचा. आणि आपण स्वतःला कसे संरक्षित करू शकता ते येथे दिले आहे!

Related Articles

मुलांमधिल डेंग्यू ताप – बचाव, लक्षणे आणि उपचार

Read More
सिट्रोनेला तेल, नीलगिरी तेल - 100% नैसर्गिक डांस विकर्षक

नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट ना समजून घेणे – सिट्रोनेला आणि नीलगिरी तेल

Read More

मॉस्किटो रिपेलंटस च्या दंतकथांची पोलखोल!

Read More

भारतात मॉनसून पावसा बरोबर मलेरिया आणि डेंग्यू वाढत आहेत

Read More

मलेरियाची चिन्हे जाणून घ्या आणि रात्रीच्या वेळी हत्याकांडापासून स्वतःला वाचवा!

Read More

डेंग्यू तापाच्या धोक्याची सूचना आणि लक्षणे जाणून घ्या

Read More

Find The Right Repellent

Find Your Protector