X
आता खरेदी करा
Mommy Zone May 24, 2019

मुलांमध्ये प्रारंभिक टप्प्यातिल डेंग्यूचा ताप शोधण्याचा सुलभ मार्ग

मागील काही वर्षांत, मच्छरां द्वारे पसरणार्‍या रोगांच्या प्रमाणात पुष्कळ वाढ झाली आहे. डेंग्यू, मलेरिया आणि झिका विषाणू इत्यादी रोगांमुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत आणि प्रचंड लोकसंख्ये ला त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. यात डेंग्यू सर्वत्र आढळणारा आहे आणि त्याने बर्‍याच जणांचा जीव घेतला आहे. खासकरून मुलांमध्ये डेंगूची लक्षणे अगदी अस्पष्ट असतात. जितकं मूल लहान तितकी लक्षणे अधिक गंभीर असतात आणि संसर्ग झाल्यानंतर चार दिवसांनीच ते कळते.

 

आपण लक्ष ठेवण्याची गरज आहे अशा मुला मधिल डेंग्यूच्या लक्षणांची यादी येथे दिली आहे:

 

  • फ्लू सदृश आजार: जर आपल्या मुला ला वाहणारे नाक आणि खोकल्या बरोबर उच्च ताप असेल तर हे डेंग्यूच्या लक्षणांपैकी एक असू शकते. जरी ही लक्षण साध्या फ्लूसारखीच असली तरी 24 तासांच्या तापानंतर बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा आणि हे आवश्यक आहे की तो डेंग्यू आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आवश्यक चाचण्या कराव्यात.
  • वर्तणूकित बदल : प्रौढांच्या तुलनेत, मुलांना काय होत आहे हे समजण्यात ते असमर्थ असतात. यामुळे मुलांमध्ये अधिक सतावणे आणि चिडचिड होते आणि त्यासाठी कोणतेही स्पष्ट कारण नसते. ते त्रागा करतील आणि बर्‍याचदा त्यांची भुक कमी झाल्याचे आपल्या ला दिसेल.
  •  शारीरिक त्रास : डेंग्यूची लागण झालेल्या मुलांमध्ये तीव्र वेदना, पाठदुखी आणि डोकेदुखी इत्यादि लक्षणे दिसू लागतात. आपल्या मुलास काय होत आहे हे समजण्यासाठी बोलणे सुरू ठेवा जेणेकरुन आपण ते डॉक्टरला समजावून सांगू शकाल.
  • गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या: मळमळ, उलट्या इ. सारखे लक्षणे आहेत ज्यामुळे गॅस्ट्रोएन्टेरिटिस झाला आहे अस चुकीच निधान होऊ शकत. ते तिव्र पोटदुखी देखील अनुभवू शकतात.
  • त्वचेच्या समस्या: मुलांना डेंग्यूचा संसर्ग झाल्यास त्यांच्यात आढळणार्‍या सर्वात सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे त्वचेचा त्रास. हे गोवर झाल्यावर पॅचेस दिसतात तसे दिसतात. लक्ष देण्यासारखं आणखी एक लक्षण सतत खाज सुठने हे आहे.
  • रक्तस्त्रावः प्लेटलेटची संख्या कमी झाल्यामुळे, मुलांना त्यांच्या हिरड्या आणि नाकातून रक्तस्त्राव होतो. अशा प्रकरणांमध्ये तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे कारण ति हेमोरॅजिक ताप किंवा शॉक सिंड्रोम सारख्या घातक स्थितीत जाऊ शकतात.

 

आपले मुल यापैकी कोणतीही लक्षणे दर्शवित असेल तर, आपल्याला आवश्यक असलेले उपाय येथे आहेत:

 

  • आपल्या बालरोगतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या जे उपचार करण्यासाठी पुढील उपाय सुचवतील
  • आपल्या मुलाला थकवा येत नाही याची खात्री करा. आपल्या मुलाची लक्षणे किती कठोर आहेत यावर अवलंबून त्याला कमीत कमी १५ दिवस ते एक महिन्याची विश्रांती लागेल
  • त्यांना सूप, फळे, उकडलेल्या भाज्या इ. सारखे हलके जेवण द्यावे लागेल.
  • जर आपले मूल स्तनपान करित असेल तर, आपण कोणताही फीड सोडणार नाहि याची खात्री करा. मोठ्या मुलांसाठी, त्यांना हायड्रेट करावे लागेल. इलेक्ट्रोलाइट इ. सारख्या मौखिक हायड्रेशन पर्यायांचा विचार करा.
  • थंड पाण्यात भिजवले ले कापड किंवा थंड पाण्याचे स्पंज ठेवून तापमान कमी करण्यात मदत होईल

 

आपल्या मुलास डेंग्यूने संसर्ग होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी येथे काही निवारक उपाय आहेत जे आपण घेऊ शकता:

 

  • आपल्या मुलांच्या आजूबाजूला साठलेल पाणी नाही याची खात्री करा. फक्त आपल्या घरातच नाही तर आपल्या परिसरातही. याबद्दल कारवाई करण्यासाठी आपल्या शेजार्‍याशी सहयोग करणे कदाचित मदतीच ठरू शकेल.
  • फ्युमिगेशन: जेव्हा आपले मुल आजूबाजूला नसेल तेंव्हा आपल्या क्षेत्राला कीटक नियंत्रण करणार्‍या व्यावसायिकांद्वारे धुराची फवारणी करा.
  • आपल्या मुलाला शक्य तितके जास्त कपडे घालावे.
  • मॉस्किटो रिपेलंटचा वापर करा. गुडनाइटकडे मॉस्किटो रिपेलंटची विस्तृत श्रेणी आहे जी बाजारात सहज उपलब्ध आहे.
  • प्रत्येक कुटुंब सदस्य दिवसातून दोनदा शॉवर घेण्या सारखी मूलभूत स्वच्छता पाळत असल्याचे सुनिश्चित करा. घाम देखील मच्छर आकर्षित करतो.

 

 

भारतातील बहुतेक भाग उष्णकटिबंधातील वातावरणाशी निगडित आहेत आणि तिथेच डेंग्यू सर्वाधिक प्रमाणात सर्वत्र फैलावतो. जर आपले मुल डेंग्यूच्या तापाची लक्षणे दर्शवित असेल तर या लेखातील सामायिक उपायांचे अनुसरण करा. शिवाय, याची खात्री करा की प्रतिबंधक उपाय केले जावेत, याचा कधीही संसर्ग होऊ नये हे उत्तम, असे आपणास वाटत नाही का?

Related Articles

मुलांसाठी नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंटस

Read More

गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन कसा वापरावा हे लक्षात ठेवण्याचे मनोरंजक मार्ग

Read More

डेंग्यू आणि चिकनगुनियापासून आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी 4 टिप्स

Read More

आपल्या मुलांबरोबर खेळण्यासाठी 10 इंडोर गेम्स

Read More

मुलांसह पावसाळी हंगामाचा आनंद घ्या

Read More

आपल्या मुलांसाठी सर्वात प्रभावी आणि सुरक्षित मॉस्किटो रिपेलंट

Read More

Find The Right Repellent

Find Your Protector