हा ब्लॉग मॉमी ब्लॉगर अवंतिका चिट्लांगिया यांनी लिहिला होता
मॉनसून हा माझा आवडता ऋतु आहे. मुसळधार पाऊस, आनंदी वातावरण, टवटवीत हिरवळ आणि संपूर्ण वातावरण मला आतून आनंद मिळविण्यास कधीही अपयशी ठरत नाही, आणि हा माझा वाढदिवसाचा महिना आहे हे न विसरता! माझ्या लाहनग्याला माझ्यासारखंच पाणी आवडतं – ते तलाव असो, न्हाण्याची वेळ असो वा पाण्याशी खेळत प्यायला. पाऊस पडतो तेव्हा तो खूप रोमांचित होतो आणि विश्वास ठेवा, त्याला वीजांचा कडकडाट घाबरवत नाही; तो हसतो!
प्रत्येक पालकाने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून ते आणि त्यांची मुले दोघही या ऋतुचा आनंद घेऊ शकतील:
1. लस
मॉनसून सुरू होण्याआधी फ्लू ची लस टोचून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात, कारण ह्याच काळात विषाणू सर्वात जास्त पसरतात. आणि आजकाल एच1एन1(H1N1) हे सर्वत्र आहे आणि हे सांसर्गिक असल्यामुळे आपण अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे. लसीकरणासंबंधी सल्ला घेण्यासाठी बालरोगतज्ञांशी बोला. एकदा ते आपल्या मनातून बाहेर पडले की आपण अधिक निश्चिंत व्हाल. माझ्या बाळाला मागच्या मॉनसून मध्ये फ्लू झाला होता आणि तो आठवडा मी विसरणार नाही. त्यानंतर, मी खात्री करते की त्याला बालरोगतज्ञांनी शिफारस केलेली इन्फ्लूएंजा ची लस आणि इतर लसी टोचून घेते.
2. पावसाळी साहित्य
जर तुमची मुल शाळेत जात असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी पावसाचे बूट किंवा क्रॉक्स / बूट व रेनकोट्स आणले असतील. पादत्राणे आरामदायक आहेत आणि चांगली पकड असलेले आहेत याची खात्री करा कारण सर्वत्र निसरड झालेल असत आणि मुले धावणे आणि खेळणे थांबवत नाहीत, त्यांनी तसे का करावे. केवळ रेनकोट्सच्या प्रिंट किंवा रंगा वरुन जाऊ नका, त्याच्या प्लास्टिकची गुणवत्ता पहा आणि चांगल्या ब्रँडसाठी जा. माझ्या लहान बाळाला रेनकोट आहे पण त्याला घालायला आवडत नाही. मी एक मोठी छत्री वापरते जी आम्हा दोघांना सामावून घेते. मी जाणून घेऊ इच्छिते की जर तुमच्या बाळाने रेनकोट घालण्यास नकार दिला तर तुम्ही काय कराल?
3. कीटक आणि मच्छरां पासून त्यांना सुरक्षित ठेवा
मॉनसून आसो वा नसो, विविध कारणांमुळे सर्वत्र मच्छर असतात. आणि पावसाळ्यात दोन दिवस पाऊस पडायचा थांबला असेल तर सर्व साठलेल्या पाण्यामुळे मच्छर लवकर वाढतात, आणि मच्छरां चा सर्वात भयावह भाग म्हणजे डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरियासारखे रोग.
जेंव्हा हवामान परवानगी देते तेंव्हा मी माझ्या लहान मुलाला बाहेर जाताना संपूर्ण पॅंट घालते, परंतु मी नियमितपणे एक गोष्टीच अनुसरण करते, नेहमी आम्ही बाहेर जातो तेंव्हा मॉस्किटो रिपेलंट चा वापर करतो. मी अलीकडे गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन मॉस्किटो रिपेलंट वापरुन प्रारंभ केला आहे. आणि मला ते पूर्णपणे आवडते कारण ते 100% नैसर्गिक आहे आणि वापर करणे इतके सुलभ आहे! फक्त आपल्या कपड्यांवर 4 ठिपके लावावे लागतात.
4. कोठे खेळायचे?
बर्याच कारणांमुळे पावसाळ्यादरम्यान मुलांना बाहेर खेळण्याची परवानगी देण्यास आम्ही पालक घाबरतो आणि सावधगिरी बाळगतो. परंतु कमीतकमी पाऊस पडत नसल्यास, आम्ही त्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे. मच्छरांचा दंश आणि आजारपणाची चिंता जर आपल्याला थांबवत असेल तर आपल्या बाळांच रक्षण करण्यासाठी अनेक मॉस्किटो रिपेलंटस उपलब्ध आहेत! सहलींसाठी किंवा लोणावळा, माथेरान, खंडाळा आशा सुंदर ठिकाणांकडे जाण्यासाठी देखील मॉनसून चांगला आहे आणि गुडनाइट पॅच दिवसभरासाठी चांगला आहे आणि अनुप्रयोगांच्या दृष्टीने तो सर्वात सोपा आहे – यामुळे हे प्रवास करण्यासाठी योग्य आहे. पालक आळीपाळीने खेळण्यासाठी सर्व मुलांना घरी आमंत्रण देऊन चांगला वेळ देऊ शकतात! एकमेकाबरोबर मिसळण्यासाठी आणि कंटाळवाणेपणा दूर ठेवण्यासाठी एक मजेदार मार्ग. तसेच जेव्हा आपला मुलगा इतर प्लेडेट्सवर असेल तेव्हा आपल्याकडे काही ‘मी’ वेळ देखील असेल!
5. त्यांना होऊ द्या!
आम्ही, पालक आज अत्यंत घाबरलेले, चिंताग्रस्त, जास्त काळजी करणारे आहोत आणि का नाही – गोष्टी पाहिल्यासारख्या तितक्या सुरक्षित नाहीत. आम्ही मुलांना पावसात भिजू देत नाही किंवा चिखलातल्या पाण्यात उड्या मारू देत नाही. पण मला खरोखरच वाटते की आपण त्यांना तसे करू दिले पाहिजे. काही मजा घेतल्याशिवाय बालपण काय आहे? धुऊन टाकण्यासाठी काही अतिरिक्त मळलेले कपडे मौल्यवान बालपणाच्या सर्व आठवणीं च्या इतके मोल असलेल्या आहेत. खरं तर, मी एक पाऊल पुढे जाईन आणि त्याच्या सोबत एक डबक्यात जाईन आणि माझे बालपणीचे दिवस पुन्हा जिवंत करीन!