X
आता खरेदी करा
Understand Mosquitoes April 8, 2019

सर्वोत्कृष्ट नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट तेल कसे निवडावे

आपण सर्व उत्तम प्रकारे रचना केलेल्या विश्वाचा भाग आहोत, जिथे एक जिव दुसर्‍यावर  अवलंबून असतो. पण ते म्हणतात ना , एक मनुष्याच जेवण दुसर्‍या माणसाच विष आहे. असे एक उदाहरण म्हणजे मच्छरांचे. नर मच्छर केवळ फुलांच्या मकरंदावर वाढतात, परंतु  मादी मच्छरांना त्यांच्या अंडी सुपिक करण्यासाठी रक्त आवश्यक असते आणि त्यामुळे त्या माणसांना  दंश करतात. ह्या मच्छराच्या दंशाचे तात्काळ परिणाम फक्त पुरळ आणि खाज हेच नसतात  तर त्यांच्यात गंभीर संसर्गदोष आणि आजार निर्माण करण्याची शक्यता  असते.

 

म्हणून एका निवांत दुपारी, जेव्हा आपण आपल्या घराच्या बाहेर जाऊन घरामागील अंगणात  आराम करण्याचा निर्णय घेता आणि नकोसे वाटणारे मच्छर आपल्या बरोबर असतील तर  किटकांना मारण्याचे एक साधन घेऊन आपला दिवस घालवणार आहात का? जरी आपण घरातच  राहायचे निवडले तरीही, हे अतिथी आपल्या घरातही प्रवेश करणार नाहीत का? तर, तुम्ही काय निवडाल – एकदा चावल्यावर, दोनदा भिडस्त? किंवा एकदा चावल्यावर, दोनदा संरक्षित?

 

डासांच्यामुळे होणार्‍या वाढत्या रोगांमुळे बहुतेक लोक आता मानतात की प्रतिबंध करणे हे उपचार करण्यापेक्षा बरे आहे आणि अश्या मच्छरांपासून बचाव करण्यासाठी उपाय योजतात. विविध नैसर्गिक रिपेलंट तेल आणि लोशन आहेत जे या त्रासदायक मच्छरांना आणि त्यांच्यामुळे होणा-या संसर्गाना दूर ठेवतील.

 

मॉस्किटो रिपेलंट तेले का लोकप्रिय आहेत? कारण त्यांच्याकडे विविध उपयोग आहेत!

 • ते कोणत्याही मच्छरांना रोखण्यासाठी आणि पुरळ आणि खाज टाळण्यासाठी संरक्षक स्तर तयार करतात
 • उन्हाळ्यात आणि पावसाच्या दरम्यान ते रोग पसरण्यास प्रतिबंध करतात
 • इतर दंश आणि डाग बरे करण्यासारखे त्यांचे दुय्यम फायदे आहेत

 

आपण मॉस्किटो रिपेलंट तेलाची निवड करताना, योग्य निवड करणे देखील महत्त्वपूर्ण आहे. कृत्रिम आणि नैसर्गिक असे दोन्ही उपलब्ध आहेत. नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट तेलांची मागणी वाढत आहे कारण:

 • नैसर्गिकरित्या तयार केलेल्या मॉस्किटो रिपेलंट तेलामध्ये मच्छर शरीरापासून दूर ठेवणारे फेरोमोन्स (pheromones) असतात.
 • ही तेलं त्वचेला अनुकूल आहेत आणि अनुप्रयोगा नंतर कोणत्याही खुणा मागे ठेवत नाही.
 • त्यांचे नैसर्गिक सुगंध इतर इंद्रियेसाठी सुखकारक आहे

 

अनेक घटक आहेत जे तेलांच्या स्वरूपात संभाव्य मॉस्किटो रिपेलंट म्हणून वापरले जाऊ शकतात. अशा घटकांची सूची खाली सूचीबद्ध केली आहे:

 1. सिट्रोनेला: डासांच्या विरूद्ध काम करणारे हे एक सामान्य नैसर्गिक आणि प्रभावी तेल आहे. वनस्पतीच्या मिश्रणातून बनवलेले सिट्रोनला तेल हे बर्‍याच मॉस्किटो रिपेलंटमध्ये एक सामान्य घटक आहे.
 2. नीलगिरी: हे नैसर्गिकरित्या तयार केलेले तेल एक प्रभावी क्लिनर आहे, जे त्याच्या कीटकनाशक क्षमते साठी ओळखले जाते – नीलगिरीच्या सर्वात लहान वासाच्या झुळूके ने मच्छर पळून जातात! नीलगिरी उगवण्यामध्ये समस्या नाही आणि तेल काढणे अत्यंत सोपे आहे. हे सर्व स्टोअरमध्ये देखील सहज उपलब्ध आहे.
 3. लॅव्हेंडर: जेव्हां तुम्ही लॅव्हेंडरबद्दल विचार करता तेव्हा प्रथम तुम्ही त्याच्या सुगंधी सुगंधाबद्दल विचार कराल. लॅव्हेंडर त्याच्या मनःस्थितीस पूरक असलेल्या सुवासाने जागेचा तनाव कमी करते. परंतु कमी ज्ञात असलेले त्याचे गुणधर्म रोगजंतूना प्रतिकूल गुणधर्म आहेत – होय, लॅव्हेंडर आपल्या सभोवतालच्या मच्छर व कीटकांना पळवून लावण्यात सक्षम आहे! आपल्या पलंगाजवळ आणि उशाच्या खाली लॅव्हेंडरचे साठे हे त्रासदायक मच्छर काढून टाकतील.
 4. तुळस: तुळस एक केवळ सुगंधी औषधी वनस्पती नाही तर ती कोणत्याही पादार्थाचा स्वाद वाढवू शकते; मच्छरां विरुद्ध ती प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. तुळशीच तेल रिपेलंट म्हणून वापरल्यास दुप्पट फायदे होतात – घराच्या आसपास ह्या तेलाची फवारणी केल्यास फक्त मच्छरांच्या प्रवेशास प्रतिबंध होणार नाही तर सभोवतालचा परिसर सुगंधी होईल.
 5. बर्गामोट: लिंबा च्या वासाने उद्भवणारी मनःस्थिती प्रत्येकास आवडते; बर्गामोट ऑइल त्यापेक्षा जास्त आहे! ह्या नैसर्गिक तेला मध्ये फळांच्या सुगंधांसह मच्छरां विरुद्ध क्षमता आहे. ह्या तेलाची एकमात्र मर्यादा म्हणजे ते फोटोटॉक्सिक आहे, याचा अर्थ ते यूव्ही लाइटसह त्वचेवर दाहक प्रतिक्रिया देऊ शकते. म्हणून बर्गामोट तेल संध्याकाळी वापरणे चांगले आहे.

 

अशी बरीच नैसर्गिक तेलं आहेत जे आपल्याला मच्छिमारांपासून नैसर्गिक पद्धतीने प्रभावीपणे संरक्षित करतात. मच्छर चावणे धोकादायक ठरू शकते कारण ते हानिकारक जीवाणू आणि व्हायरस घेऊन येतात, यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया इ. आजार होऊ शकतात.

 

मच्छरांपासून घर आणि घराबाहेर संरक्षण करणे आवश्यक आहे. मच्छरांपासून आपले संरक्षण करण्यासाठी निसर्गाचे परिपूर्ण उपाय असले तरी गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन सारख्या वैयक्तिक रीपेलंट्स वापरणे शहाणपणाचे आहे, जे शुद्ध सीट्रोनेला आणि नीलगिरीचे तेल यासारख्या 100% नैसर्गिक घटकांसह बनलेले आहे जे मच्छरांपासून संपूर्ण संरक्षण पुरवतात. आपल्या कपड्यांवर फॅब्रिक रोल-ऑनच्या फक्त 4 ठिपके लागू करा आणि 8 तास सलग संरक्षण करा!

 

 

Related Articles

डासांपासून पूर्ण स्वातंत्र्य कसे मिळवावे

मच्छरांपासून मुक्त कसे व्हावे?

Read More

शाळेत जाणार्‍या मुलांसाठी स्वच्छता सुनिश्चित करण्याचे स्मार्ट(चलाख) मार्ग

Read More

डेंग्यू मच्छरांच प्रजनन कोठे होत?

Read More

आपल्याला डेंग्यूबद्दल माहित असणे आवश्यक आहे ते सर्व

Read More

चिकनगुनिया, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल आपल्याला जे सर्व माहित असणे आवश्यक आहे

Read More

Find The Right Repellent

Find Your Protector