X
आता खरेदी करा
Understand Mosquitoes April 8, 2019

आपल्याला डेंग्यूबद्दल माहित असणे आवश्यक आहे ते सर्व

डेंग्यू म्हणजे काय?

डेंग्यू हा मच्छरांपासून होणारा रोग असून चार वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरस डीएनव्ही 1-4 प्रकारांमुळे होतो व एड्स (Aedes) मच्छर तो पसरवतो. दरवर्षी सुमारे 390 दशलक्ष डेंग्यू संसर्ग नोंदविले जातात, ज्यातील 96 दशलक्ष मध्ये ह्याची लक्षणे दिसतात. आज, 128 देशांमध्ये सुमारे 3.9 अब्ज लोकांना डेंग्यूचा धोका आहे.

 

डेंग्यूचे लक्षणे काय आहेत?

हा तीव्र फ्लूसारखा आजार आहे ज्याच्यात अचानक ताप येतो आणि वेदनादायक डोकेदुखी होते. इतर लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ येणे, स्नायू आणि सांध्यात वेदना, मळमळ आणि उलट्या यांचा समावेश आहे. अतिरीक्त प्रकरणात, जास्त रक्तस्त्राव आणि मृत्यू होऊ शकतो.

 

डेंग्यू कसा टाळता येईल?

एडीस (Aedes) मच्छर डेंग्यू पसरवतात, जे दिवसाच्या वेळी (सूर्यप्रकाशाचे तास) काटेकोरपणे पसंत करतात. अगदी एखादाच मच्छर चावल्या मुळे डेंग्यू होऊ शकतो॰ म्हणून घरामध्ये आणि बाहेर, खासकरून दिवसा, प्रिय व्यक्तींचे संरक्षण करणे आवश्यक आहे. बाहेर जाण्या पूर्वी, गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन (किंवा गुडनाइट कूल जेल / पॅच इ.) सारख्या वैयक्तिक रीपेलंट्सचा वापर मच्छरांचा दंश रोखू शकतो.

 

घरी असताना संध्याकाळी दरवाजे आणि खिडक्या बंद करा आणि दिवसाच्या दरम्यान गुडनाइट एक्टिव+ व गुडनाइट फास्ट कार्ड सारख्या घरगुती पातळीवरील रीपेलंट्सचा वापर मच्छरांना दूर ठेवेल.

 

 

डेंग्यू झाल्याचं आपल्याला कसे कळेल/ डेंग्यूच्या निदानासाठी कोणत्या चाचण्या उपलब्ध आहेत?

डेंग्यूचा ऍन्टीबॉडीज (IgG आणि IgM) आणि पोलिमारेझ चेन रिअॅक्शन (PCR) द्वारे व्हायरसची उपस्थिती निश्चित करण्यासाठी डेंग्यूची चाचणी घेतली जाऊ शकते. आदर्शरित्या, या चाचण्या रुग्णाला लक्षणे दिसायला लागल्यावर पहिल्या काही दिवसांतच केल्या पाहिजेत. चाचण्या स्थानिक रुग्णालयात किंवा आरोग्य चिकित्सालय येथे केल्या जाऊ शकतात.

 

 

डेंग्यूचा उपचार काय आहे? तेथे काही लसी उपलब्ध आहेत का?

डेंग्यूसाठी कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही; लक्षणांचे योग्य व्यवस्थापन महत्वाचे आहे, विशेषत: शरीरातील द्रव मुबलक प्रमाणात राखणे. डेंग्यूविरोधी लस व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध आहे, जी मेक्सिको ब्राझील, एल साल्वाडोर आणि फिलीपिन्समध्ये उपलब्ध आहे. WHOने लसच्या सार्वत्रिक वापरावर औपचारिक मनोभूमिका पक्की केली नाही, परंतु स्थानिकांनी आपल्या लसीचे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांमध्ये विचार करणे गरजेचे आहे अशी शिफारस केली आहे. बर्‍याच लस प्रकारा वर सध्या जगभरात संशोधन आणि विकास सुरू असताना आपण मच्छरांच्या  चावण्या आणि डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी पुरेशी सावधगिरी बाळगली पाहिजे.

 

डेंग्यू बाबत अधिक माहिती कोठे मिळू शकते?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO), सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) आणि भारतातील राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम ऑफ इंडिया (NVBDCP) च्या वेबसाईट्स डेंग्यू, त्याची लक्षणे आणि उपचारांविषयी अद्ययावत माहिती पुरवतात. जर एखाद्याला तीव्र ताप अचानक उद्भवल्यास आणि वेदनादायक डोकेदुखी आणि / किंवा त्वचेला पुरळ आली असेल तर कृपया स्थानिक डॉक्टर, आरोग्य केंद्र किंवा आरोग्य सेवा प्रदात्यांचा सल्ला घ्यावा.

 

 

Related Articles

डासांपासून पूर्ण स्वातंत्र्य कसे मिळवावे

मच्छरांपासून मुक्त कसे व्हावे?

Read More

शाळेत जाणार्‍या मुलांसाठी स्वच्छता सुनिश्चित करण्याचे स्मार्ट(चलाख) मार्ग

Read More

डेंग्यू मच्छरांच प्रजनन कोठे होत?

Read More

सर्वोत्कृष्ट नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट तेल कसे निवडावे

Read More

चिकनगुनिया, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल आपल्याला जे सर्व माहित असणे आवश्यक आहे

Read More

Find The Right Repellent

Find Your Protector