X
आता खरेदी करा
Understand Mosquitoes May 26, 2019

शाळेत जाणार्‍या मुलांसाठी स्वच्छता सुनिश्चित करण्याचे स्मार्ट(चलाख) मार्ग

हा ब्लॉग मॉमी ब्लॉगर, शिल्पा बिंद्लिश यांनी लिहिला होता

 

आतापर्यंत साडेतीन दशकांपासून शिक्षण उद्योगाशी संबंध असल्याने, मी ठामपणे समर्थन करते की शाळांमध्ये आवश्यक विषयांबद्दल शिक्षण देण्यापेक्षा ‘आरोग्य आणि स्वच्छता’ चे ज्ञान मुलांना दिले पाहिजे. आणि त्याद्वारे, केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमात सुधारणा न करता, लहान वयापासून उच्च पातळीवरील वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी चांगल्या सवयीनी मुलांना सशक्त करा.

 

आदर्शपणे, शाळेचे अधिकारी आणि पालकांनी, मुलांच्या आरोग्यास गंभीर धोका असलेल्या रोगांविरुद्ध संरक्षण प्रणाली तयार करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी संघटित झाले पाहिजे.

 

अद्यावत मार्गाने खराब आरोग्यास लढण्यास मदत करणार्‍या (पडताळणी सूची) चेकलिस्टमध्ये हे समाविष्ट आहे:

 

त्या जंतूना दूर करा:

खाण्याआधी,संडासात जाऊन आल्यावर,खोकल्यावर किंवा शिंकल्यावर,आणि कचर्‍याचाडबा हाताळण्यासारख्या गंभीर वेळी आपल्या मुलास त्याचे हात धुण्यास मार्गदर्शन करा. ही सवय निर्माण केल्याने आपल्या मुलाला आजारी पडण्यार्‍या बर्‍याच जंतूंची शक्यता नाहीशी होते. मी वैयक्तिकपणे शिफारस करते,  आपल्या मुलाच्या शाळेच्या बॅगमध्ये त्वचाशास्त्रज्ञाने चाचणी केलेले, अल्कोहोल मुक्त हात स्वच्छ करण्याची साधने ठेवावीत, जी जर पाणी उपलब्द नसेल तर नियमितपणे स्वच्छतेसाठी वापरली जाऊ शकतात.

 

 

वैयक्तिक स्वच्छता:

 

जरी त्यांना स्वच्छ राहण्यामुळे जीवनाच्या गुणवत्तेवर प्रचंड परिणाम होऊ शकतो हे पूर्णपणे समजत नसेल तरीही प्राइमरी स्कूलींगच्या वयात मुलांना चांगल्या स्वच्छतेची सवय लावावी. आईवडिलांनी स्वत: आदर्श पद्धतीने वागून आपल्या मुलांमध्ये मूलभूत सवयींच्या सवयींना आधार देण्यास मदत केली पाहिजे. दात घासणे, शॉवर घेणे, कपडे बदलणे, नख कापणे इत्यादी सारख्या सामान्य दररोजच्या रीतिरिवाजांचे   काटेकोरपणे पालन करावे. हे सुनिश्चित करेल की मुले संसर्गजन्य आजारांचा बळी पडणार नाहीत किंवा शाळा / अभ्यास चुकवणार नाहीत.

 

याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरियासारख्या अनेक आजारांमुळे बाहेर असताना वैयक्तिक  मच्छर संरक्षण वापरणे गरजेचे आहे कारण हे आजार दिवसा दंश करणार्‍या मच्छरांमुळे पसरतात.बाहेर पडण्या अगोदर मॉस्किटो रिपेलंटस लावण्याची सवय लावून घ्या.

 

मुलांना चिकट क्रीम वापरण्यास सोयीस्कर नसल्यास, त्यांना शाळेत दिवसभराच्या संरक्षणासाठी गुडनाइट फॅब्रिक रोल-ऑन,जे एक नाविन्यपूर्ण मॉस्किटो रिपेलंट आहे ते वापरण्यास प्रोत्साहित करा. केवळ त्यांच्या कपड्यांवर 4 ठिपके लागू करण्याची गरज आहे आणि त्यांना 8 तासांपर्यंत मच्छरांपासून संरक्षित केले जाते.

 

हे 100% नैसर्गिक आणि बालरोगतज्ज्ञ प्रमाणित आहे ज्यामुळे ते वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. सर्वात चांगला भाग म्हणजे कपड्यांवर लागू करणे आवश्यक आहे, परंतु आपल्या त्वचेवर नाही (ते डाग  पाडत नाही).

 

 

स्वच्छ शौचालय / रेस्टरुम्स:

 

शाळेच्या स्वच्छ शौचालयासारख्या मूलभूत सुविधांचा मुलांना हक्क आहे. शाळेच्या प्रशासनाने  नियमितपणे शौचालयात पाणी उपलब्ध करविणे आवश्यक आहे. वॉश बेसिन, साबणाचे डिस्पेंसर, दरवाजाचे नॉब, हॅन्डल्स इत्यादी रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शाळेच्या साफसफाई करणार्‍या सदस्यांनी नियमितपणे निर्जंतुक केले पाहिजे. शौचालये / रेस्टरूम च्या परिसरातिल उग्र घाण वासा च्या समस्या  झाडू मारून व पुसून झाल्यावर एअर फ्रेशनर्सची फवारणी करून हाताळल्या पाहिजे.

 

 

कचर्‍याची विल्हेवाट:

 

शाळेच्या परिसरात, बराच कचरा दिवसा च्या शेवटी कचरापेटीत गोळा केला जातो जो विविध जीवाणूजन्य रोग आणि श्वसनविषयक एलर्जींसाठी मुख्य कारण बनतो. या डंपिंग ग्राउंड्स रोग पसरवणार्‍या  मच्छरांसाठी होटस्पॉट देखील बनू शकतात. शाळा विद्यार्थ्यांमध्ये इको-जागरूकता आणण्यासाठी  क्रियाकलप करू शकेल ज्यायोगे वर्गाच्या क्षेत्रापासून दूर कचर्‍या साठी खड्डे खोदून घेता येतील जेथे ते हा कचरा टाकू शकतील आणि खतामध्ये विघटन करू शकतील. हे केवळ शिकण्याच्या पैलूमध्येच नाही तर मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका देखील टाळेल.

 

 

आजारपण हाताळताना

 

योग्य स्वच्छता मार्गदर्शनांचा प्रयोग केल्यावरही, आपल्याला शाळेत असताना आपल्या मुलास अशुद्ध वातावरणास सामोरे जाण्याची शंका किंवा जर त्याने पूर्वी दुर्बल प्रतिकार यंत्रणेचे लक्षणे दाखवले असतील तर आपल्याला सावधगिरीचे उपाय आधी घेतले पाहिजे.

 

पालकांनी वर्षभरात जेंव्हा मुले आजारी पडतात तेव्हा त्यांचे लसीकरण केले पाहिजे. आपल्या मुलाला जर तो अस्वस्थ होण्याची चिन्हे दर्शवित असेल तर शाळेत पाठविणे टाळा, कारण सामायिक केलेल्या जागा आणि पुरवठा एका विद्यार्थ्यापासून दुस-या विद्यार्थ्यांकडे त्वरेने जंतूंचा प्रसार करतात.

 

मुलाच्या कल्याणासाठी मुख्य योगदानकर्ते असल्याने, पालक आणि शालेय अधिकारी मुलांच्या वागणुकीना  मोठ्या प्रमाणावर प्रभावित करू शकतात आणि ते निरोगी आयुष्यामध्ये दीर्घ आयुष्य वाढविण्यासाठी चांगल्या स्वच्छता सवयींचा वापर करतात याची खात्री करतात.

 

 

 

Related Articles

डासांपासून पूर्ण स्वातंत्र्य कसे मिळवावे

मच्छरांपासून मुक्त कसे व्हावे?

Read More

डेंग्यू मच्छरांच प्रजनन कोठे होत?

Read More

सर्वोत्कृष्ट नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट तेल कसे निवडावे

Read More

आपल्याला डेंग्यूबद्दल माहित असणे आवश्यक आहे ते सर्व

Read More

चिकनगुनिया, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल आपल्याला जे सर्व माहित असणे आवश्यक आहे

Read More

Find The Right Repellent

Find Your Protector