Q16. डेंग्यूसाठी उपचार काय आहे? त्यासाठी एखादी लस उपलब्ध आहे काय?+
डेंग्यूसाठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत; लक्षणांवरून रोगाचा उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे असते, खासकरून शरीरातील द्रवपदार्थांची पातळी कायम राखणे.
डेंग्यूसाठी व्यापारी तत्त्वावर लस उपलब्ध आहे, जी मेक्सिको, ब्राझिल, एल साल्वादोर आणि फिलिपिन्समध्ये उपलब्ध आहे. या रोगाच्या लशीच्या जागतिक वापराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने कोणताही अधिकृत पवित्रा घेतलेला नाही, मात्र या रोगाची साथ असणाऱ्या देशांनी त्यांच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात लशीचा समावेश करण्याबाबत विचार करण्याची शिफारस केली आहे. जगभर अनेक लस वॅक्सीन कँडिडेट्वर संशोधन सुरू असले तरीही, डास चावण्यापासून व डेंग्यूपासून बचावासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर पुरेशी काळजी घेणे सुरू ठेवले पाहिजे.